Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25
नवोदय विद्यालय समिती (NVS) (भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत एक स्वायत्त संस्था) मार्फत जवाहर नवोदय विद्यालयांतील शैक्षणिक वर्ष २०२५-२५ मधील रिक्त जागांवर इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वीमधील प्रवेशाकरिता दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सिलेक्शन टेस्ट आयोजित केली जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार ग्रामीण भागातील होतकरू मुला/मुलींना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत नवोदय समिती मार्फत जवाहर नवोदय विद्यालये (जेएन्की) सुरू करण्यात आली.
३१ मार्च २०२४ रोजी देशातील २७ राज्यांत आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६५३ जवाहर नवोदय विद्यालये सुरू आहेत. नवोदय विद्यालय समितीद्वारे जवाहर नवोदय विद्यालयांत ६ वी ते १२ वीपर्यंत सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. आज देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांत एकूण १२ लाखांच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
NVS पुणे विभागांतर्गत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत, गुजरातमधील ३४ जिल्ह्यांत, गोव्यातील २ जिल्ह्यांत, दादरा नगर हवेलीमधील १ जिल्ह्यात व दमण आणि दिव मधील २ जिल्ह्यांत जवाहर नवोदय विद्यालये आहेत.
(१) प्रत्येक जिल्ह्यात मुला/मुलींना एकत्रित शिक्षण देणाऱ्या निवासी शाळा,
(२) मुला/ मुलींसाठी वेगवेगळी हॉस्टेल सुविधा, (३) विनामूल्य शिक्षणाची/राहण्याची/जेवणाची व्यवस्था, (९ वी ते १२ वीच्या मुलांना (अजा/अज/ दिव्यांग/मुली/दारिद्र्य रेषेखालील (BPL) कार्ड धारक उमेदवारांना वगळता) रु. ६००/- दरमहा फी भरावी लागेल.)
(४) क्रमिक पुस्तके, स्टेशनरी, युनिफॉर्म्स शासनामार्फत मोफत पुरविले जातात,
(५) स्थलांतर योजने अंतर्गत सांस्कृतिक देवाणघेवाण (हिंदी भाषिक आणि अहिंदी भाषिक राज्यांतील विद्याथ्यांची),
(६) स्पोर्ट्स आणि गेम्सना वाव दिला जातो,
(७) एन्सीसी/स्काऊट्स अँड गाईड्स/एन्एस्एस,
(८) ८ वीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत दिले जाते, त्यानंतर गणित व विज्ञान इंग्रजी माध्यमातून व सोशल सायन्स विषय इंग्रजी/हिंदी भाषेतून शिकविले जातात.
(९) ६ वी ते १२ वीच्या वर्गात प्रत्येकी ८० जागा असतात,
(१०) इ. ६ वीतील प्रवेश सिलेक्शन टेस्टमधून केले जातात,
(११) इ. ९ वी आणि ११ वीच्या वर्गात जागा रिक्त असल्यास लॅटरल एन्ट्रीनुसार प्रवेश दिला जातो,
(१२) ११ वीला विज्ञान (गणितासह), विज्ञान (गणिताशिवाय), कॉमर्स (गणितासह), कॉमर्स (गणिताशिवाय), आर्ट्स (ह्यूमॅनिटीज) आणि व्होकेशनल शाखांमधील अभ्यासक्रम शिकविले जातात.
अधिक Government नोकरी व तसेच प्रायव्हेट नोकरी च्या जागा जाणून घेण्यासाठी वरील लिंक वर click करा.
जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25)
- JEE Mains 2024 परीक्षेत १२,०७१ पैकी ४,३५२ विद्यार्थी उत्तीर्ण. JEE Advanced 2024 परीक्षेत ३,७९२ पैकी १,२२८ विद्यार्थी उत्तीर्ण.
- NEET 2024 परीक्षेत २४,५२९ पैकी १९,१८३ विद्यार्थी उत्तीर्ण.
- CBSE बोर्डाच्या २०२४१० वी परीक्षेचा निकाल ९९.०९%.
- CBSE बोर्डाच्या २०२४१२ वी परीक्षेचा निकाल ९८.९०%.
जवाहर नवोदय विद्यालयांतील सन २०२५-२६ मधील इयत्ता ११ वीतील प्रवेशासाठी पात्रतेच्या अटी (Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25)
- ज्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या जिल्ह्यामधील शासनमान्य शाळेतून विद्यार्थी सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १० वी शिकत असावा.
- उमेदवाराचा जन्म दि. १ जून २००८ ते ३१ जुलै २०१० दरम्यानचा असावा.
निवड पद्धती(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25) –
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये JNV मधून इ. १० वी उत्तीर्ण उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता इ. ११ वीला प्रवेश दिल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवरील प्रवेश Lateral Entry Test (सिलेक्शन टेस्ट) जी दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी घेऊन त्यामधील गुणवत्तेनुसार केले जातील.
ग्रामीण, मुली, अजा, अज, दिव्यांग कॅटेगरीनुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. संबंधित जिल्ह्यातील JNV मधील रिक्त जागांवर उमेदवार निवडल्यानंतर राज्य स्तरावर सामान्य गुणवत्ता यादी बनविली जाईल. उमेदवारांची गुणवत्ता आणि त्यांनी दिलेला पसंतीक्रम पाहून राज्य स्तरावरील सामान्य गुणवत्ता यादीमधून उमेदवार उरलेल्या रिक्त जागांवर निवडले जातील. एका राज्यातील उमेदवार दुसऱ्या राज्यातील प्रवेशासाठी पात्र नाहीत. उमेदवारांना जास्तीत जास्त दोन विद्या शाखांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त शाखांसाठी केलेले अर्ज विज्ञान, कॉमर्स, ह्यूमॅनिटिज आणि व्होकेशनल या क्रमाने स्विकारले जातील.
११ वीतील लॅटरल एन्ट्री प्रवेश गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व JNVs मध्ये विज्ञान शाखेतील प्रवेश उपलब्ध आहेत. कॉमर्स शाखेतील प्रवेश अकोला, चंद्रपूर, सातारा येथील JNVs मध्ये उपलब्ध आहेत. तसेच ह्युनिटिज शाखेतील प्रवेश जालना आणि बुलढाणा, नॉर्थ गोवा येथील JNVs मध्ये उपलब्ध आहेत.
ग्रामीण भागातील शाळेतून इ. १० वीचे शिक्षण घेतलेले उमेदवार rural candidates म्हणून समजले जातील. त्यांना Rural Quota मधून प्रवेश दिला जाईल. शहरी भागातील शाळेतून इ. १० वीचे शिक्षण झालेले उमेदवारांना Urban Candidates म्हणून समजले जाईल.
जाहिरातीमधील Annexure-A मध्ये लॅटरल एन्ट्री सिलेक्शन टेस्ट २०२५ चा अभ्यासक्रम दिलेला आहे. सिलेक्शन टेस्ट २०२५ – १०० गुणांसाठी असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. प्रत्येक विषयासाठी वेळ ३० मिनिटे, एकूण वेळ २ तास ३० मिनिटे
(i) मेंटल अॅबिलिटी टेस्ट
(ii) इंग्लिश सेक्शन-ए वाचन कौशल्य १० गुण; सेक्शन-बी ग्रामर १० गुण.
(iii) गणित,
(iv) ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ प्रत्येकी २० प्रश्न, प्रत्येकी १ गुण.
विज्ञान, (v) सोशल सायन्स या विषयांवरील उमेदवारांनी सर्व पाचही विषयांत प्रत्येकी किमान ६ गुण मिळविणे आवश्यक. स्ट्रीमनुसार मेरिट लिस्ट बनविताना पुढील विषयांमधील मिळालेले गुण विचारात्त घेतले जातील.
सायन्स (फिजिक्स आणि केमिस्ट्री अनिवार्य) मेंटल अॅबिलिटी सायन्स गणित.
कॉमर्स (अकाऊंटन्सी, बिझनेस अँड इकॉनॉमिक्स अनिवार्य) मेंटल अॅबिलिटी सोशल सायन्स गणित, ह्युमॅनिटीज (हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स अनिवार्य) मेंटल अॅबिलिटी सोशल सायन्स उरलेल्या ३ विषयांपैकी एक
विषय ज्यात जास्तीत जास्त गुण मिळालेले आहेत.
प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी OMR शीट दिली जाईल. OMR शीटवर उत्तर मार्क करण्यासाठी फक्त ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पॉईंट पेनचाच वापर करावा. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्लिश भाषेत छापलेली असेल. सिलेक्शन टेस्टचा निकाल मे/जून २०२५ मध्ये www.navodaya.gov.in या वेबसाईटवर जाहीर केला जाईल.
जवाहर नवोदय विद्यालयातील सन २०२५-२६ मधील इयत्ता ९ वीतील प्रवेशासाठी पात्रतेच्या अटी-
(१) ज्या जिल्ह्यांतील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या जिल्ह्यामधील शासनमान्य शाळेतून विद्यार्थी सन
२०२४-२५ मध्ये इयत्ता ८ वीमध्ये शिकत असावा.
(२) उमेदवाराचा जन्म दि. १ मे २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यानचा असावा. (सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागू) निवड पद्धती हिंदी १५ प्रश्न, इंग्लिश १५ प्रश्न, गणित ३५ प्रश्न, आणि विज्ञान ३५ प्रश्न या विषयांवर आधारित्त OMR
बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप एकूण १०० प्रश्न, प्रत्येकी १ गुणासाठी असे एकूण १०० प्रश्न. वेळ २ तास ३० मिनिटे, विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात किमान पात्रतेचे गुण मिळविणे आवश्यक. परंतु गणित विज्ञान दोन भाषांपैकी ज्यात जास्त गुण मिळाले आहेत असे तीन विषयांचे
गुण एकत्र करून गुणवत्ता यादी बनविली जाईल.
चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय रिक्त जागांचा तपशिल –
अमरावती ५, बुलढाणा ७, गडचिरोली ३, लातूर १०, नागपूर १८, नांदेड ८, उस्मानाबाद ८, अहमदनगर ७, बीड
८, जळगाव ६, नाशिक ३, नंदूरबार । १०, पालघर १५, जालना ४, हिंगोली ३, गोंदिया १४, वर्धा ८, यवतमाळ – ६,
चंद्रपूर ६, सांगली १४, रत्नागिरी १९, सिंधुदुर्ग ३१, छत्रपती संभाजी नगर ७, कोल्हापूर ६, अकोला ३, रायगड १३,
सातारा ८, सोलापूर ६, पुणे ८, वाशिम ३, परभणी८, धुळे १४, नंदूरबार ।। ५, भंडारा ११. निवडलेल्या उमेदवारांना संबंधित JNV च्या प्रिंसिपलकडून SMS/स्पीड पोस्टाद्वारे सूचित केले जाईल. नविन प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना मेडिकल सर्टिफिकेट सादर करावे लागेल. शिवाय त्यांना विद्यालयाच्या डॉक्टरकडून वैद्यकिय तपासणी करून घ्यावी लागेल.
नविन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि शैक्षणिक कमी दूर करण्यासाठी नविन प्रवेश दिलेल्या उमेदवारांसाठी १० दिवसांचा Orientation Programme आयोजित केला जाईल.
अॅडमिट कार्ड – JNV च्या अॅप्लिकेशन पोर्टलवरून डाऊनलोड करता येतील. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी पुढील कागदपत्रं स्कॅन करून (JPG Format size 10-100 KB) अपलोड करावीत. (१) फोटोग्राफ, (२) पालकाची स्वाक्षरी, (३) उमेदवाराची स्वाक्षरी. ऑनलाईन अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरील लिंकमधून दि. ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत करावेत. प्रत्येक JNV मधे हेल्पडेस्कची मदत घेवून उमेदवार विनामूल्य अॅप्लिकेशन सबमिट करू शकतात.
नवोदय विद्यालय समितीचे महत्त्व व उद्दिष्टे(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25)-
नवोदय विद्यालय समिती (NVS) हे भारत सरकारचे एक स्वायत्त संस्थान आहे, जे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाअंतर्गत कार्यरत आहे. नवोदय विद्यालयांची स्थापना १९८६ साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी करण्यात आली होती. देशातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत पुरविले जाते. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लक्ष दिले जाते, कारण त्यांना शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी शैक्षणिक संधी मिळतात. त्यामुळे नवोदय विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष जोर देण्यात येतो.
जवाहर नवोदय विद्यालयांच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
नवोदय विद्यालय समितीच्या शाळांमध्ये मुलांसाठी विविध सुविधा पुरवल्या जातात, ज्यामुळे त्यांचे सर्वांगीण शारीरिक, मानसिक, आणि बौद्धिक विकास होतो. या सुविधांमध्ये मुख्यतः खालील बाबींचा समावेश होतो:
निवासी आणि विनामूल्य शिक्षण(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये मुलामुलींना निवास आणि शिक्षण पूर्णतः विनामूल्य दिले जाते. मुलामुलींच्या निवासी हॉस्टेल्सच्या सुविधा स्वतंत्र आहेत, जेणेकरून त्यांच्या सुरक्षेचा आणि आरामाचा विचार करता येतो. हॉस्टेल्समध्ये मुलांच्या राहण्याची, खाण्याची, तसेच शिक्षणाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था केली जाते. ६वी ते १२वी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. फक्त अजा/अज, दिव्यांग, मुली आणि गरीबी रेषेखालील (BPL) विद्यार्थी वगळता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ६०० शुल्क आकारले जाते.
शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
विद्यार्थ्यांना शालेय ग्रंथालय, अभ्यास साहित्य, क्रमिक पुस्तके, स्टेशनरी, गणवेश, आणि इतर शैक्षणिक साहित्य सरकारकडून मोफत पुरविले जातात. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व साहित्य विनामूल्य मिळते, ज्यामुळे त्यांच्या पालकांवरील आर्थिक भार कमी होतो.
सांस्कृतिक देवाणघेवाण योजना(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
विद्यार्थ्यांच्या संस्कृतीमध्ये एकात्मता आणि विविधता आणण्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण योजना (Migration Plan) राबवली जाते. यात हिंदी भाषिक आणि अहिंदी भाषिक राज्यांतील विद्यार्थ्यांची देवाणघेवाण होते. अशा प्रकारे विद्यार्थी एकमेकांच्या संस्कृतीचा अनुभव घेतात आणि त्यांच्यात सामंजस्य, सहिष्णुता आणि राष्ट्रभक्तीचे मूल्य जोपासले जाते.
क्रीडा व खेळांच्या सुविधा(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
नवोदय विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचा विकास करण्यासाठी विविध खेळ, क्रीडा कार्यक्रम, तसेच योगाचे शिक्षण दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून त्यांच्यातील नेतृत्वगुण, संघभावना, आणि सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते.
एनसीसी, स्काऊट्स आणि गाईड्स(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
विद्यार्थ्यांमध्ये सेवा भाव व राष्ट्रीयता निर्माण करण्यासाठी NCC (National Cadet Corps), स्काऊट्स आणि गाईड्स, तसेच NSS (National Service Scheme) सारख्या विविध सेवाभावी उपक्रमांचा समावेश असतो. हे कार्यक्रम विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्त्व शिकवतात आणि त्यांच्यातील समाजाभिमुखता वाढवतात.
शिक्षणाची भाषा व माध्यम(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले जाते, कारण यातून त्यांचा अध्ययनाचा पाया मजबूत होतो. त्यानंतरच्या वर्गांमध्ये गणित आणि विज्ञान इंग्रजी माध्यमातून शिकवले जाते. सोशल सायन्स इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून शिकवले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांची तयारी करण्यात मदत मिळते.
संगणकीय शिक्षण व तांत्रिक कौशल्ये(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
नवोदय विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाशी परिचितता मिळते. विविध सॉफ्टवेअर्स, इंटरनेटच्या वापराचा अनुभव, आणि डिजिटल माध्यमांतून माहिती शोधण्याच्या कौशल्यांचा विकास केला जातो. त्यामुळे विद्यार्थी नोकरीसाठी सज्ज होतात.
प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या नियमावली
इयत्ता ६ वी प्रवेशासाठी निवड प्रक्रिया
सर्वप्रथम इयत्ता ६ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड चाचणी घेतली जाते. या निवड चाचणीचा उद्देश ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची ओळख पटवणे आहे. निवड चाचणीत विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता, गणित, आणि भाषा यावर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान पात्रतेचे गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.
इयत्ता ९ वी आणि ११ वी प्रवेशासाठी लॅटरल एंट्री प्रक्रिया
प्रत्येक वर्षी जवाहर नवोदय विद्यालयांत रिक्त राहिलेल्या जागांसाठी लॅटरल एंट्री टेस्टद्वारे इयत्ता ९ वी आणि ११ वीमध्ये प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इ. ९ वी आणि इ. ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी लॅटरल एंट्री चाचणी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुढील अटी पूर्ण कराव्या लागतील:
इयत्ता ११ वी प्रवेश पात्रता
- विद्यार्थी इ. १० वी मध्ये शाळा शिकत असावा.
- जन्मतारीख १ जून २००८ ते ३१ जुलै २०१० दरम्यानची असावी.
इयत्ता ९ वी प्रवेश पात्रता
- विद्यार्थी इ. ८ वीमध्ये शिकत असावा.
- जन्मतारीख १ मे २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यानची असावी.
सिलेक्शन टेस्ट (लॅटरल एंट्री) परीक्षेचे स्वरूप:
इयत्ता ११ वी साठी निवड चाचणीचे स्वरूप:
- विषय: मेंटल अॅबिलिटी टेस्ट, इंग्लिश, गणित, विज्ञान, आणि सोशल सायन्स
- एकूण प्रश्न संख्या: प्रत्येकी १०० प्रश्न (प्रत्येक १ गुण)
- वेळ: २ तास ३० मिनिटे
- प्रश्न प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- OMR शीट: उत्तर पत्रिकेत ब्लू किंवा ब्लॅक बॉल पॉईंट पेन वापरून उत्तर लिहावे.
इयत्ता ९ वी साठी निवड चाचणीचे स्वरूप:
- विषय: हिंदी, इंग्रजी, गणित, आणि विज्ञान
- प्रश्नांची संख्या: एकूण १०० प्रश्न
- वेळ:२ तास ३० मिनिटे
- विद्यार्थ्यांना किमान पात्रतेचे गुण मिळवणे आवश्यक आहे.
जिल्हानिहाय रिक्त जागांचा तपशील (महाराष्ट्र)
| जिल्हा | रिक्त जागा |
- | अमरावती | ५ |
- | बुलढाणा | ७ |
- | गडचिरोली | ३ |
- | लातूर | १० |
- | नागपूर | १८ |
- | नांदेड | ८ |
- | अहमदनगर | ७ |
- | बीड | ८ |
- | जळगाव | ६ |
- | नाशिक | ३ |
- | पालघर | १५ |
- | जालना | ४ |
- | हिंगोली | ३ |
- | गोंदिया | १४ |
- | वर्धा | ८|
- | यवतमाळ | ६ |
- | चंद्रपूर | ६ |
- | सांगली | १४ |
- | रत्नागिरी | १९ |
- | सिंधुदुर्ग | ३१ |
- | रायगड | १३ |
- | सातारा | ८ |
- | सोलापूर | ६ |
- | पुणे | ८ |
- | वाशिम | ३ |
- | परभणी | ८ |
- | धुळे | १४ |
- | भंडारा | ११ |
प्रवेश अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25):
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:
- पालक व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले फॉर्म
- विद्यार्थी फोटो (JPEG फॉर्मॅट मध्ये १० ते १०० KB)
- विद्यार्थ्याचे वय प्रमाणित करणारे दाखले (कागदपत्रे)
अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख(Navodaya Vidyalaya Class 9 Admission Form 2024-25)
सर्व अर्ज दि. ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदवता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: सुहास पाटील – ९८९२००५१७१
अधिकृत वेबसाईट: [www.navodaya.gov.in](http://www.navodaya.gov.in)