आर्मी पब्लिक स्कूल’ (APS) मध्ये शिक्षक पदांच्या भरती (Government Jobs for Teachers)

Government Jobs for Teachers

आर्मी पब्लिक स्कूल’ (APS) मध्ये शिक्षक पदांच्या भरती

(Government Jobs for Teachers)

आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) यांचेमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील विविध कॅन्टॉन्मेंट्स आणि मिलिटरी स्टेशन्समधील एकूण १३९ ‘आर्मी पब्लिक स्कूल’ (APS) मध्ये शिक्षक पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट (OST) २३, २४ आणि २५ नोव्हेंबर २०२४ रोजी घेणार आहेत.

APS मधील शिक्षक निवड प्रक्रियेत जेव्हा इंटरव्ह्यू/अध्यापन कौशल्य मूल्यमापन चाचणीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. तेव्हा शाळानिहाय रिक्त पदांचा तपशील जाहीर केला जाईल. या परीक्षेतून पुढील पदांच्या भरतीसाठी उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी निवडले जातील. (यातील काही पदे कायम स्वरूपी असतील, तर काही पदे ठराविक मुदतीसाठी असतील.) APS शाळा CBSE बोर्डाशी संलग्न आहेत.

महाराष्ट्रात असलेली आर्मी पब्लिक स्कूल्स(Government Jobs for Teachers Locations)

  1. APS, पुणे
  2. APS, खडकी
  3. APS, दिघी
  4. APS, देहू रोड
  5. APS, खडकवासला
  6. APS, देवळाली
  7.  APS, मुंबई
  8.  APS, अहमदनगर
  9. APS, काम्टी (नागपूर)
  10. APS, MIC & S, अहमदनगर.

(Government Jobs for Teachers)

 पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) – पात्रता – किमान ५०% गुणांसह

  • संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि
  • बी.एड्. उत्तीर्ण.

ट्रेण्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) पात्रता किमान ५०% गुणांसह

  • संबंधित विषयातील पदवी आणि
  • बी.एड्. उत्तीर्ण.

ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट २०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण अशा २०० गुणांसाठी वेळ ३ तास.

  • PRT/TGT/PGT पदांसाठी सेक्शन-ए बेसिक जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी १० प्रश्न.
  • सेक्शन-बी अध्यापन शास्त्र (Pedagogy), अभ्यासक्रम (curriculum) आणि शैक्षणि धोरण (education policy) संबंधित २० प्रश्न
  • सेक्शन-सी शैक्षणिक प्रविणता (Academic Proficiency) १७० प्रश्न. (प्रश्नांची काठीण्य पातळी पदनिहाय असेल.)

प्रायमरी टीचर (PRT) पात्रता किमान ५०% गुणांसह

  • पदवी
  • बी. एड्. किंवा इलेमेंटरी एज्युकेशनमधील दोन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण.

TGT साठी पुढील विषयांचे परीक्षा घेतली जाईल.

  1. हिंदी
  2. इंग्लिश
  3. संस्कृत
  4. हिस्ट्री
  5. जॉग्रफी
  6. इकॉनॉमिक्स
  7. पॉलिटिकल सायन्स
  8. मॅथेमॅटिक्स
  9. फिजिक्स
  10. केमिस्ट्री
  11. बायोलॉजी
  12. कॉम्प्युटर सायन्स
  13. फिजिकल एज्युकेशन

PGT साठी वरील (TGT साठी दिलेल्या) १३ विषयांपैकी संस्कृत विषय वगळता आणखी पुढील विषयांसाठीसुद्धा परीक्षा घेतली जाईल.

  • अकाऊटन्सी
  • बायोलॉजी,
  • पॉलिटिकल सायन्स
  • इकॉनॉमिक्स
  • बायोटेक्नॉलॉजी
  • सायकॉलॉजी
  • कॉमर्स
  • होम सायन्स.

वयोमर्यादा – (Government Jobs for Teachers)

(दि. १ एप्रिल २०२४) रोजी अनुभव नसलेले उमेदवार ४० वर्षेपर्यंत ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले उमेदवार ५७ वर्षेपर्यंत.

TGT आणि PRT साठी उमेदवारांनी CTET/TET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. परंतु CTET/TET उत्तीर्ण नसलेले उमेदवार जर इतर अटींची पूर्तता करत असतील तर त्यांना या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात भरती केले जाईल.

निवड पद्धती (ए) स्टेज-१ ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (MCQ) असेल. जी दि. २३, २४ व २५ नोव्हेंबर २०२४ रोजी AWES मार्फत आयोजित केली जाईल.

ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट (OST) साठी सहभाग घेतलेल्या उमेदवारांना स्कोअर कार्ड दिले जाईल, जे पूर्ण हयातभर ग्राह्य असेल.

OST ला बसण्यासाठी CTET/TET अनिवार्य नाही, परंतु TGTS/PRTs पदांवर नेमणूक मिळण्यासाठी CTET/TET अनिवार्य आहे. पदवीला ५०% पेक्षा कमी गुण मिळालेले पदव्युत्तर पदवीधारक (ज्यांना पदव्युत्तर पदवीला सरासरी ५०% पेक्षा किंवा अधिक गुण मिळाले असतील) असे उमेदवार TGT आणि PRT साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.(Government Jobs for Teachers)

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील. पात्रतेसाठी पेपरमध्ये किमान ५०% गुण मिळविणे आवश्यक आहे.

उमेदवारांचे पेपरमधील गुण १०० गुणांसाठी नॉर्मलाईज्ड् केले जातील. परीक्षा शुल्क सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी रु. ५००/- (अजा/अज/दिव्यांग/महिला उमेदवार यांना फीमध्ये कोणतीही सवलत नाही.) फी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे.

परीक्षा केंद्र मुंबई, नागपूर, पुणे व देशातील इतर ३८ केंद्र. (यातील आपल्या पसंतीनुसार उमेदवार कोणतीही तीन केंद्र निवडू शकतात.)स्क्रीनिंग टेस्टचे उमेदवारांना स्कोअर कार्ड दिले जातील, जे पूर्ण हयातभर ग्राह्य असेल. ज्यावर आधारित निवड प्रक्रियेच्या पुढील स्टेजेससाठी जाऊ शकतील.

(बी) स्टेज-२ इंटरव्यू संबंधित APS शाळा आपल्याकडील रिक्त पदांसाठी स्थानिय वर्तमानपत्रांतून, शाळेच्या वेबसाईटवर / नोटीस बोर्डवर जाहिरात प्रसिद्ध करतील. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे, त्यांच्याकडून इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना बोलाविले जाईल.

नियमित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा इंटरव्यू सेंट्रल सिलेक्शन बोर्ड आणि फिक्स्ड् टर्म पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा

इंटरव्यू लोकल सिलेक्शन बोर्ड घेईल. इंटरव्ह्यू ग्रुप ऑफ स्कूल्स (क्लस्टर) साठी घेतले जातील. निवडलेल्या उमेदवारांना या ग्रुपमधील शाळांमध्ये सामावून घेतले जाईल. जर उमेदवारांची संख्या अधिकची असेल तर इंटरव्यू घेणारी अथॉरिटी स्क्रीनिंग करू शकतात.

(सी) स्टेज-३ अध्यापन कौशल्यांचे मूल्यमापन (इव्हॅल्युएशन ऑफ टिचिंग स्किल्स) आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट (भाषा विषयातील टीचर्स पदासाठी या टेस्ट व्यतिरिक्त १५ गुणांसाठी लेखी परीक्षा ज्यात निबंध लेखन व कॉम्प्रिहेन्शन यांचा समावेश असेल). (Government Jobs for Teachers)

स्टेजेस २ व ३ या बोर्ड ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन यांचेद्वारे कमांड मुख्यालय/स्कूल मॅनेजमेंट घेतल्या जातील. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपण शैक्षणिक दृष्ट्या पात्र असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच पात्रतेची अट अर्ज करण्याच्या दिवशी लागू आहे. अॅडमिट कार्ड दि. १२ नोव्हेंबर २०२४ पासून अॅडमिट कार्ड http://aps-csb.in या संकेतस्थळावर अपलोड केले जातील.

उमेदवारांनी अॅडमिट कार्ड सोबत दिलेल्या सूचनांचे नीट पालन करणे बंधनकारक असेल. परीक्षेचा निकाल दि. १० डिसेंबर २०२४ रोजी लागण्याची शक्यता आहे.

निवड प्रक्रिये संबंधी काही तक्रार असल्यास ती संबंधित कमांडचे मुख्यालयातील चेअरमन, बोर्ड ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन यांचेकडे करावे.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन टॅब http://aps-csb.in या पोर्टलवर उपलब्ध आहे. उमेदवारांना परीक्षा पद्धती अवगत करण्यासाठी ऑनलाईन मॉक टेस्ट दि. १ नोव्हेंबर २०२४ पासून रजिस्ट्रेशन पोर्टल http://aps- csb.in वर उपलब्ध करून दिली जाईल.

स्क्रीनिंग टेस्टसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन http://aps-csb.in या पोर्टलवर दि. २५ ऑक्टोबर २०२४ (संध्याकाळी ५.०० वाजे) पर्यंत करता येईल.

हेल्पलाईन नंबर ७९६९०४९९४१. ई-मेल awes helpdesk@smartexams.com निवड प्रक्रियेच्या स्टेज-२ व स्टेज-३ मधील शंकासमाधानासाठी यांच्याशी संपर्क साधा The Chairman, Board of Administration, Army Welfare Society, HQ, Southern Command, Pune 411 001

दिनांक: २१ सप्टेंबर २०२४

सुहास पाटील – ९८९२००५१७१

अनेकवचन: 2 thoughts on “आर्मी पब्लिक स्कूल’ (APS) मध्ये शिक्षक पदांच्या भरती (Government Jobs for Teachers)”

  1. पिंगबॅक: प्रोबेशनरी ऑफिसर(Probationary Officer) पदासाठी भरती जाहीर...

  2. पिंगबॅक: Customer Support Executive या पदा साठी जागा व चांगला पगार30k

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top